
Vishal Kenjale’s inspiring MPSC success after 11 attempts — a story of determination, hard work, and fulfilling parents’ dreams.
Sakal
-सुधीर जाधव
गाेवे : ''काेणी काेणाच्या घरात अन् काेणाच्या पाेटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं, मात्र यशाची स्वप्न पाहून ती कष्टातून सत्यात उतरवण हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. गरीब घरात जन्माला आलाे म्हणून रडत बसायचं नसते तर प्रयत्नांची पराकाष्टा करुन आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं''. हेच स्वप्न उराशी बाळगून गाेवे (ता.सातारा) येथील विशाल बाळकृष्ण केंजळे(वय41) यांनी एका वर्षात ११ वेळा सरळसेवेत यश मिळवले. त्यानंतर लाेकसेवा आयाेगाच्या स्पर्धा परीक्षेतून सुय़श मिळवत यशाला गवसणी घातली आहे. त्यांची इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे येथे लिपिक पदावर निवड झाल्याने जिल्ह्यातून काैतुक हाेत आहे.