Gram Panchayat Election : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी 22 डिसेंबरला मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election

पोटनिवडणुकींसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे.

Gram Panchayat : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी 22 डिसेंबरला मतदान

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील (Gram Panchayat Election) रिक्त झालेल्या सदस्य पदांच्या पोटनिवडणुकींसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे. यानुसार पोटनिवडणुकीसाठी ता. 22 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्‍याची माहिती तहसीलदार सुषमा पैकेकरी (Tehsildar Sushma Paikekari) यांनी पत्रकाद्वारे दिली.

जाहीर कार्यक्रमानुसार, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करणे संबंधित यंत्रणांना आवश्‍‍यक आहे. यानुसार ता. 30 नोव्हेंबर ते ता. 6 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते 3 या वेळेत पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत.

हेही वाचा: 'ज्यांना मी वाढवलं, तेच मला हद्दपार करायला निघालेत'

ता. 7 रोजी प्राप्‍त अर्जांची छाननी होणार असून 9 रोजी दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत देण्‍यात आली आहे. अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडल्‍यानंतर त्‍याच दिवशी दुपारी चिन्‍हवाटप, तसेच अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी ता. 21 रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून, ता. 22 रोजी मतमोजणी होणार असल्‍याचेही सुषमा पैकेकरी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

हेही वाचा: 'आमदार शिंदेंची दहशत आम्हाला संपवायची होती, म्हणूनच आम्ही..'

loading image
go to top