
कास: कांदाटी, सोळशी, कोयना व तापोळा विभागांतील झालेली विकासकामे रस्ते, पूल मोऱ्या ही निकृष्ट दर्जाची झाली असून, त्यांची चौकशी करून अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कारवाई करावी. महावितरण व दूरसंचार विभागाने कारभार सुधारावा आदी मागण्यासाठी १०५ गाव समाज संघटनेच्या वतीने आज वाघेरा येथे रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे महाबळेश्वर- तापोळा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान आंदोलकांनी विभागातील निकृष्ट कामांचा अधिकाऱ्यांसमोर पाढा वाचला.