खंबाटकीतील एस कॉर्नरवर अपघात; वाईतील एक गंभीर जखमी

खंबाटकीतील एस कॉर्नरवर अपघात; वाईतील एक गंभीर जखमी

खंडाळा (जि. सातारा) : पुणे- बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात गुरुवारी एस कॉर्नरवर उलट्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्‍टरला समोरून येणाऱ्या माल वाहतुक करणा-या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्‍टरचालक रमेश लिंगाप्पा पुजारी (रा. महात्मा फुलेनगर, वाई) हे गंभीर जखमी झाले. ट्रॅक्‍टरमधील तीन मजूर किरकोळ जखमी झाले. 

याबाबत पोलिसांनी सांगितले, की खंडाळ्यावरून उलट्या दिशेने बोगद्यामार्गे ट्रॅक्‍टर तीन मजूर व साहित्य घेऊन वाईकडे निघाला होता. या वेळी एकेरी वाहतूक असणाऱ्या बोगद्यातून भरधाव वेगात साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या माल वाहतुक करणा-या गाडीस समोरूनच जोरदार धडक दिली.
 
हा अपघात इतका गंभीर होता, की ट्रॅक्‍टर हा ट्रॉलीपासून वेगळा झाला, तर या अपघातात दोन्हीही गाड्याचे मोठे नुकसान झाले. या अपघातात ट्रॅक्‍टरमधील काशिनाथ शंकर बन्ने (वय 45), दत्ता मल्लेश कोळी (वय 40) व दयानंद करिअप्पा बिराजदार (सर्व रा. फुलेनगर वाई) हे मजूर किरकोळ जखमी झाले.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com