कोल्हापूरच्या दोघांनी वाईतील जुळ्या भावांना गंडविले; कऱ्हाडात गुन्हा दाखल

कोल्हापूरच्या दोघांनी वाईतील जुळ्या भावांना गंडविले; कऱ्हाडात गुन्हा दाखल
Updated on

कऱ्हाड : लष्कारात भरती करतो, असे सांगून वाई येथील दोन जुळ्या भावडांना तीन लाख 61 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार येथे उघडकीस आला. त्यांना पाच लाखांचा गंडा घातला होता. त्यातील काही रक्कम भामट्यांनी परत केली. मात्र, तीन लाख 61 हजार रुपये परत केले नाहीत. त्यामुळे वाई येथील फसवणूक झालेल्यांनी तालुका पोलिसात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. प्रदीप तरडे (वय 45) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांच्या पुतण्याची फसवणूक झाली आहे. अक्काईचीवाडी येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आला आहे. दादासाहेब रामचंद्र चिकाटे व सदानंद बाणे (रा. कोल्हापूर) गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
उदयनराजेंनी केले पंतप्रधान नरेंद्र माेदींचे अभिनंदन
 
पोलिसांनी दिलेली माहीती अशी, प्रदीप तरडे यांचे पुतणे श्रीकांत तरडे व श्रीधर तरडे (वय 20) जुळे भावंडे आहेत. दोघेही डिप्लोमा इंजिनिअरिंगला आहेत. त्यांना लष्कारात भरती व्हायचे आहे. त्यासाठी प्रदीप तरडे यांच्या ओळखीचे दिलीप कुंभार (रा. वाई) यांनी दादासाहेब रामचंद्र चिकाटे यांचे नाव सुचवले. त्यांची पाचवड फाटा येथे ओळख करून दिली. दादासाहेब चिकाटे यांनी दोन्ही मुलांना नोकरीस लावण्यासाठी सहा लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यांना कोल्हापूर येथे सदानंद बाणे यांना भेटायला जावे लागेल, असेही सांगितले. सदानंद बाणे यांना भेटायला गेलो असता त्यांनी तुमच्या दोन्ही पुतण्याचे काम करतो, असे स्पष्ट केले. त्यासाठी ऍडव्हान्स दोन लाख रुपये एप्रिल 2019 मध्ये पाचवड फाटा येथे सदानंद बाणे, दादासाहेब चिकाटे यांना दिले. त्यानंतर जुलै 2019 मध्ये पुतण्याचे जॉईनिंग लेटर सदानंद बाणे यांनी त्याच्या मोबाईलमध्ये दाखविले व त्या वेळी तीन लाख रुपयांची मागणी केली. 

शरद पवार नेहमीच आधुनिक शिक्षणासाठी आग्रही : डाॅ. अनिल पाटील

चार दिवसानंतर उंब्रज येथे चिकाटे, बाणे यांना रोख दाेन लाख रुपये दिले. 28 ऑगस्ट 2019 रोजी चिकाटे यांच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेच्या बचत खात्यावर एक लाख रुपये भरले. बाणे यांनी 11 नोव्हेंबर 2019 रोजी हैदराबाद सिकंदराबाद येथील आर्मी सेंटरला रिपोर्टिंग करण्यासाठी जा, असे सांगितले. तेथे हजर राहण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर एक माणूस पुतण्यांना नेण्यास येईल, असे बाणे व चिकाटे यांनी सांगितले. तेव्हा खासगी वाहनाने तेथे गेलो असता ती व्यक्ती रेल्वे स्टेशनवर आली नाही. बाणे, चिकाटे यांना फोन केला असता त्यांनी अजून दोन दिवस थांबा माणूस येईल, असे सांगितले; परंतु त्याठिकाणी आम्ही तीन दिवस वाट बघून परत वाई येथे आलो. त्यानंतर पुतण्याचे नोकरीचे काम न झाल्याने बाणे व चिकाटे यांना आमची तुम्ही फसवणूक केली आहे. तुम्हाला दिलेले पाच लाख रुपये परत द्या, असे सांगितले. त्या वेळी पाच लाख 10 हजार रुपये परत मागितले. त्या वेळी त्यांनी तीन लाखांचा धनादेश दिला. दाेन सप्टेंबरला चिकाटेने एचडीएफसी बॅंकेच्या खात्यात 99 हजार रुपये पाठविले. त्यानंतर चार सप्टेंबरला तीन लाख रुपयांचा दिलेला धनादेश दिला. मात्र, तो वटला नाही. त्याची माहिती त्यांना दिली. दहा सप्टेंबरला पुन्हा त्यांनी एचडीएफसी बॅंक खात्यावर 50 हजार रुपये परत केले. राहिलेले तीन लाख 61 हजार रुपये दोन दिवसांत देतो, असे सांगितले; परंतु आजपर्यंत पैसै परत केले नाहीत. त्यामुळे मी पैसै मागण्याकरिता घरी गेलो असता परत पैसे मागण्याकरिता घरी येऊ नका, नाहीतर मी तुमच्यावर पोलिस केस करीन, अशी धमकी दिली.

हरपल आपके साथ! एलआयसी देणार मतिमंद मुलांच्या शाळेस स्कूल बस

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com