
Farmers and locals in Wakhane protesting against land measurement for road widening work.
Sakal
कऱ्हाड: येथील वाखाण ते कोरेगाव रस्त्याच्या रस्ता रुंदीकरणांतर्गत जागेची मोजणी करण्यासाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे जागा मोजणीचे काम स्थानिकांनी बंद पाडले. रस्ता रुंदीकरण समिती व शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. स्थानिकांनी केलेल्या प्रश्नांच्या भडिमारामुळे जागा मोजणीला आलेल्या पालिका व भूमिअभिलेखच्या कर्मचाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. परिणामी, त्यांना स्थानिकांनी हद्द मोजणी करून दिली नाही.