Krishna River at Risk: Untreated Sewage Released by 20 Villages in Karad Taluka”
Sakal
सातारा
Karad News:'कृष्णाकाठच्या २० गावांचे सांडपाणी नदीपात्रात': कऱ्हाड तालुक्याला प्रदूषणाचा धोका; उपायांबाबत गावागावांत अभाव !
Krishna river pollution: स्थानिक रहिवासी भीतीत आहेत. नदीचे पाणी दूषित होऊन शेतीवर परिणाम होत असल्याची तक्रार शेतकरी करतात. पाणीपुरवठा योजनांसाठीही हे मोठे संकट बनले आहे. काही सामाजिक संघटनांनी गावागावांत जनजागृती केली, परंतु उपाययोजना मात्र कागदावरच अडकून आहेत.
-सचिन शिंदे
कऱ्हाड : तालुक्यातील वीसहून अधिक गावांतील सांडपाणी थेट कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे कृष्णाकाठच्या गावांना पाणी प्रदूषणाचा धोका आहे. कऱ्हाड शहरात काही प्रमाणात सांडपाण्यावर प्रक्रिया होते. मात्र, ग्रामीण भागात उपाययोजनाअभावी गावांना धोका आहे. त्याबाबत पंचायत समितीने केलेल्या सर्व्हेत धोक्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. या सर्व्हेतही १९ गावे समोर आली आहेत. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या व सांडपाणी प्रकल्प राबविण्याच्या नोटिसाही संबंधित गावांना पंचायत समितीने दिल्या आहेत.

