
नागठाण्यात डोक्यात दगड मारल्यामुळे वॉचमन गंभीर जखमी
नागठाणे : मंगल कार्यालयाचे गेट न उघडल्यामुळे संतापलेल्या युवकाने दारूच्या नशेत वॉचमनला मारहाण केली. या वेळी डोक्यात दगड मारल्यामुळे वॉचमन गंभीर जखमी झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधिकराव रामचंद्र उंबरे (वय ५२, रा. बोरगाव, ता. सातारा) असे जखमी वॉचमनचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय ढाणे (संपूर्ण नाव समजू शकले नाही, रा. नागठाणे, ता.सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिकराव उंबरे हे नागठाणे- सासपडे रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात वॉचमन म्हणून कामाला आहेत. काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयाच्या पाठीमागे राहावयास असलेला अक्षय ढाणे हा दारूच्या नशेत गेटवर आला. त्याने उंबरे यांना गेट उघडण्यास सांगितले.
हेही वाचा: नागपूर : आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस
'तुम्ही दारू पिलेला आहात,' असे सांगून उंबरे यांनी गेट उघडण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अक्षय याने गेटजवळील दगड उचलून उंबरे यांना मारला. दगड डोक्यात लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. याची माहिती अन्य कर्मचाऱ्यांना समजल्यावर त्यांनी जखमी झालेल्या उंबरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बोरगाव पोलिस ठाण्यात अक्षय ढाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार रामचंद्र फरांदे पुढील तपास करत आहेत.
Web Title: Watchman Was Seriously Injured When He Was Hit In The Head With A Stone
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..