बोंबळवाडी तलावाजवळील विहिरीत तलावाचे पाणी मिसळल्याने पाणी दूषित झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे जुन्या योजनेचा पाणीपुरवठा बंद करून नवीन नळपाणी पुरवठा योजना तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
"Shamgaon villagers affected by polluted water; BDO inspects and orders urgent action."sakal
कोपर्डे हवेली : शामगाव (ता. कऱ्हाड) येथे गेल्या चार दिवसांपासून दूषित पाण्यामुळे अनेक जण आजारी आहेत. त्याची दखल घेत गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी शामगावला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.