esakal | कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून उद्या सोडणार पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

कोयना धरण

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून उद्या सोडणार पाणी

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (सातारा) : कोयना धरण (Koyana Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३३ हजार ९१४ क्युसेक आहे. धरणात ५८.९५ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यात तब्बल चार टीएमसीने वाढ झाली आहे. उद्या गुरुवारी (ता.२२) सकाळी अकरा वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातून कोयना नदीत दोन हजार १०० क्युसेक पाणी सोडले जाणार आहे, अशी माहिती (Satara) कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नीतेश पोतदार यांनी दिली. त्याचे नियोजन धरण व्यवस्थापनाने केले आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहातील दोन्ही युनिट सुरू करणार असल्याने पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पात्रात वाढ होणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(water discharge tomorrow from koyana dam satara news glp88)

हेही वाचा: सर्जाराजाच्या जोडीची ताटातूट, एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मुसळधार पाऊस

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३३ हजार ९१४ क्युसेक झाली असून, धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल चार टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरणात ५८.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी धुवाधार पाऊस पडत आहेत. चोवीस तासांत पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे १०९, नवजा येथे १४८, तर महाबळेश्वर येथे १४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी पाणलोट क्षेत्रातील सर्वदूर ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासांत चार टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाची जलपातळी २११.४ फूट झाली असून, धरणात ५८.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जलसंपदा विभागाने कोयना धरणाचे परिचलन करण्यासाठी धरण परिचलन सूची तयार केली आहे. त्या परिचलन सूचीप्रमाणे २२ जुलैला धरणाची जलपातळी २११७.५ फूट ठेवणे बंधनकारक आहे. पाणलोट क्षेत्रात धुवाँधार पाऊस सुरूच असून, जलपातळीत (Water Lavel) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धरणाची जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या पायथा वीजगृह चालू करायचा, की नाही याचा निर्णय घेणार असल्याचे कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पोतदार यांनी स्पष्ट केले आहे.

loading image