
Floodwater covering the bridge on Ranand–Shikhar Shinganapur road, leaving students stranded.
Sakal
गोंदवले: गेल्या चार महिन्यांपासून नदी वाहतेय. थोड्या पावसानेही नदीवरील पूल पाण्याखाली जाऊन रस्ताच बंद होतोय. बऱ्याचदा मागणी करूनही पुलाची उंची वाढवण्याकडे दुर्लक्षच होतंय. त्यामुळे ‘साहेब आता तुम्हीच सांगा, आम्ही शाळेत कसं जायचं?’ असा सवाल गोंदवले खुर्द (ता. माण) येथील विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय.