
नदीतील पाणीपातळी वाढणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कुणीही जीव धोक्यात घालून नदीपात्र ओलांडू नये, असे आवाहन पत्रकात केले आहे.
ढेबेवाडी (जि. सातारा) : रब्बी हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार आजपासून (ता. 18) मराठवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. वांग नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कुणीही नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहनही त्यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
टंचाई काळात लाभक्षेत्राला पुरून उरेल एवढा पाणीसाठा मराठवाडी धरणात शिल्लक असून, शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर तत्काळ पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. सध्या लाभक्षेत्रात हळूहळू पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली आहे.
बांधकाम पूर्ण झालेल्या नदीपात्रातील नऊही बंधाऱ्यातून पाणी उपसा मोठ्या प्रमाणात वाढल्याने धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आज (गुरुवार) सकाळी दहा वाजता या रब्बी हंगामातील तिसरे आवर्तन होत आहे. याबाबत जिहे- कटापूर प्रकल्प उपविभाग क्रमांक पाचचे सहायक अभियंता एन. ए सुतार यांनी पत्रकाद्वारे सर्व संबंधित विभागांना कळविले आहे. नदीतील पाणीपातळी वाढणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कुणीही जीव धोक्यात घालून नदीपात्र ओलांडू नये, असे आवाहन पत्रकात केले आहे.
मंदिरात मुलीवर अत्याचार; शेंबडीच्या एकास सक्तमजुरी
सिक्कीमच्या धर्तीवर पाचगणीत पार्किंग व्यवस्था करणार; खासदार श्रीनिवास पाटलांची ग्वाही
उंडाळेत आज स्वातंत्र्यसैनिक मेळावा : उदयसिंह पाटील- उंडाळकर
उंब्रज परिसरात वाळू चोरट्यांचा धुमाकूळ; दहशत निर्माण करत माफियांचा राजरोस उपसा
पहिल्याच प्रयत्नात CA परीक्षेत नेहा, प्रतीक्षाची दमदार कामगिरी; राज्यात उंचावले साताऱ्याचे नाव
Edited By : Siddharth Latkar