समृद्ध जंगलाचं प्रतीक असणाऱ्या पांढऱ्या 'शेकरू'चं महाबळेश्वरात दर्शन

White Indian Giant Squirrel
White Indian Giant Squirrelesakal

पाचगणी (सातारा) : भारतात केवळ महाबळेश्वर तालुक्यातील (Mahabaleshwar taluka) जंगलात नोंद झालेल्या व लाखात एक या प्रमाणात आढळणाऱ्या व समृद्ध जंगलाचे प्रतीक असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या झुपकेदार शेपूट असणाऱ्या शेकरूचे (White Indian Giant Squirrel) दर्शन कुतूहलाचा विषय ठरला आहे. काही महिन्यांपूर्वी टेबल लॅण्ड परिसरात लालसर रंगाचे शेकरू दृष्टीस पडले होते. गुरेघर (ता. महाबळेश्‍वर) येथे नुकताच पांढऱ्या रंगाच्या शेकरूचा वावर आढळून आला. लाखात एक अशा प्रमाणात हा प्राणी दृष्टीस पडतो. (White Indian Giant Squirrel Found At Mahabaleshwar Satara Marathi News)

Summary

सद्यःस्थितीत भारतात फक्त महाबळेश्वर आणि परिसरातील जंगलातच पांढऱ्या शेकरूची नोंद झालेली असून २००३- ०४ मध्ये त्याची प्रथम नोंद करण्यात आली.

सातारा येथील मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी त्याविषयी माहिती दिली. सामान्य खारीच्या तुलनेत आकाराने खूपच मोठी असणारी ही वनखार अर्थात शेकरू हा सस्तन प्राणी असून, महाराष्ट्रामध्ये तिला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून खास दर्जा देण्यात आला आहे. ‘रुतुगा इंडिका’ (Rutuga Indica) या शास्त्रीय नावाने परिचित ही खार महाराष्ट्रात शेकरू (Shekaru) अथवा इंडियन जॉइंट स्क्विरल (Indian Giant Squirrel) आणि मलबार जॉइंट स्क्विरल (Malabar Giant Squirrel) या नावाने देखील प्रचलित आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

White Indian Giant Squirrel
हिमालयात आढळणारा 'हा' कीडा बाजारात तब्बल 9 लाखांना विकला जातो!
Shekaru
Shekaru

पांढऱ्या शेकरूबाबत ते म्हणाले, सकाळच्या व सायंकाळच्या प्रहरी जंगलामध्ये खाद्यासाठी फिरतात, तर दुपारच्या वेळी विश्रांती असा त्यांचा दिनक्रम असतो. शाकाहारी असणारी ही शेकरू खार त्यांच्या गरुड, घुबड व बिबट्यासारख्या शत्रूपासून लपून राहण्यासाठी अथवा त्यांस चकवा देण्यासाठी झाडांवर एकत्र समूहाने भरपूर घरटी बांधतात. एकाच परिसरामध्ये जरी शेकरूंची संख्या कमी असली तरी त्याच्या दुप्पट संख्येने त्यांच्या घरट्यांच्या वसाहती दिसून येतात. सद्यःस्थितीत भारतात फक्त महाबळेश्वर आणि परिसरातील जंगलातच पांढऱ्या शेकरूची नोंद झालेली असून, २००३- ०४ मध्ये त्याची प्रथम नोंद करण्यात आली. जंगलामध्ये बीज प्रसाराचे व पर्यायाने समृद्ध जंगल तयार करण्याचे महत्त्वाचे काम शेकरूमार्फत केले जाते. त्यामुळे शेकरूचे अस्तित्व समृद्ध जंगलाचे प्रतीक मानले जाते.

White Indian Giant Squirrel
दोरीने गळफास लावून बैलाची क्रूरपणे हत्या; वाईतील एकाला अटक

निसर्गतः अल्बिनिजम ही जिवाच्या गुणसूत्रातील विकृती असून, भविष्यकाळात महाबळेश्वरातील शेकरूच्या गुणसूत्रांमध्ये होणारे बदल यामधून काही समस्या निर्देशित करत आहेत का किंवा आणखी काय यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

-सुनील भोईटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा

White Indian Giant Squirrel Found At Mahabaleshwar Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com