
-रविकांत बेलोशे
भोसे : पुस्तकांचे गाव म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या भिलार गावातील विस्तीर्ण पठारे विविध रंगांच्या, विविध आकारांच्या फुलांनी बहरू लागली आहेत. पर्यटकांना हा रंगीबेरंगी फुलांचा नजारा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी खुणावू लागला आहे. सुखद आणि आल्हाददायक वातावरणाचा अनुभव आणि फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी आता पर्यटकांची पावले पुस्तकांच्या गावाकडे वळू लागली असून, या फुलांच्या ठिकाणांकडे जाण्यासाठी सोयीसुविधा व मार्गदर्शनासाठी ग्रामपंचायत सज्ज झाली आहे.