esakal | शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघाच्या पाठीशी : सभापती राजगे
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघाच्या पाठीशी : सभापती राजगे

sakal_logo
By
रूपेश कदम

दहिवडी : शिक्षकांच्या (Teachers) प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिक्षक संघाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही माणचे सभापती नितीन राजगे यांनी माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष व शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र अवघडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्‍टमंडळाला दिली. गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मेडेवार हेही यावेळी उपस्थित होते.

यावेळी विस्तार अधिकारी सोनाली विभूते, पोपट जाधव, हणमंतराव अवघडे, सुभाष गोंजारी, महेश माने, अशोक गंबरे, किशोर देवकर, बळीराम वीरकर, सुधाकर काटकर, अजित गलांडे, श्रीमंत खाडे आदी शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते. माण तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षक संघाने पुढाकार घेतला असून, सेवापुस्तके ऑनलाइन करणे, ३१ मे २०२२ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची सेवापुस्तके पडताळणी करणे, वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवणे, शाळांची लाइट बिले ग्रामपंचायतीने भरावीत, कोविड-१९ अंतर्गत कामे यापुढे शिक्षकांना देऊ नये, हिंदी भाषा सूट, पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळावी अशा अनेक मागण्या संघटनेच्या वतीने अध्यक्ष अवघडे यांनी प्रभावीपणे मांडल्या.

हेही वाचा: शिरोळ: पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी शिक्षकांना दिलासा देताना सहकार्याची भूमिका राहणार असल्याचे प्रतिपादन केले. या वेळी नूतन विस्तार अधिकारी रमेश गंबरे यांचे स्वागत, तर लिपिक युनूस यांची बदली झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. सूरज तुपे यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ खाडे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम तोरणे यांनी आभार मानले.

loading image
go to top