कऱ्हाडात विवाहितेची नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या I Karad Police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime News

कऱ्हाड येथील जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

कऱ्हाडात विवाहितेची नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या

कऱ्हाड (सातारा) : येथील जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. काल सकाळी घटना घडली. संबंधित महिला नजीकच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सकाळी नेहमीप्रमाणे मजूर वीटभट्टीच्या कामानिमित्त भट्टी परिसरात काम करत होते. याच वेळेला संबंधित विवाहितेने जुन्या कोयना पुलावर जाऊन नदीपात्रात उडी घेतली.

ही घटना निदर्शनास आल्यानंतर पात्राकडेला असणाऱ्या अन्य महिला व नागरिकांनी तत्काळ धाव घेत विवाहितेला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र, संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस (Karad Police) तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे पुलावर, तसेच वीटभट्टी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा: चीन बनला जगातला सर्वात 'श्रीमंत देश'

loading image
go to top