

JCB accident site on Nerale–Mendheghar road in Patan taluka where a woman lost her life.
पाटण: नेरळे- मेंढेघर रस्त्यावर मान्याचीवाडी (गुंजाळी) गावानजीक जेसीबीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. नम्रता भाऊ कानडे (वय २३, रा. किल्ले मोरगिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. पाटण पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे.