
Police begin investigation after an elderly woman’s jewelry was stolen during an ST bus journey.
वडूज : एसटीतून चोरटे दागिने लांबवत असल्याचे सांगून अज्ञात महिलेने वृद्ध महिलेचे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपयांची रोख रक्कम लांबविली. रविवारी (ता. पाच) दुपारी कवठे महांकाळ- वल्लभनगर या एसटी बसमध्ये विटा ते वडूज प्रवासादरम्यान हा चोरीचा प्रकार घडला. शोभा दत्तात्रय रसाळ (वय ६२, रा. विटा, जि. सांगली) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.