

Police Reveal Chat Between Woman Doctor and Accused Prashant Bankar
Esakal
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात आता पोलिसांनी वेगळीच माहिती दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. महिला डॉक्टरने आत्महत्येआधी हातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये पीएसआय बदने आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांची नावे होती. प्रशांत बनकरला पुण्यातून अटक केली गेली. तर पीएसआय गोपाळ बदने हा स्वत:हून पोलिसात हजर झाला. महिलेनं तिच्यावर शवविच्छेदन अहवाल, फिटनेस सर्टिफिकेट यासाठी पोलिसांकडून दबाव टाकल्याचे आरोप चार पानी पत्रात केले होते. पण पोलिसांनी प्रशासकीय बाबींशी तिच्या मृत्यूचा अर्थाअर्थी संबंध नसल्याचं म्हटलंय.