
Aspirants and political leaders gear up for the Karhad mayoral race following the announcement of the open category.
Sakal
सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट, गणांची आरक्षण सोडतीची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरून सुरू आहे. यावेळेस प्रथमच आरक्षण सोडतीसाठी नवीन पद्धत वापरली जात आहे. त्यामुळे इच्छुकांत प्रचंड अस्वस्थता आहे. अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्या ज्या गट, गणात सर्वाधिक आहे, ते गट उतरत्या क्रमाने लावून त्यानुसार आरक्षण काढले जाईल. त्यातील महिला राखीवसाठी चिठ्ठ्या टाकल्या जातील. त्यानंतर उर्वरित गटातून इतर मागास प्रवर्गासाठी सोडत काढली जाईल. दोन्ही झाल्यावर उरलेले गट हे खुल्या प्रवर्गासाठी असतील. यापैकी निम्मे महिला राखीव असल्याने त्यासाठी चिठ्ठी काढली जाईल. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने अनुसूचित जाती व जमातीच्या जागा निश्चितीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.