Vaibhav from Satara, son of a labourer, proudly holding his appointment order after becoming a Class-One officer.
Sakal
-सुधीर जाधव
सातारा : लहानपणीच अनेकांची स्वप्न ठरलेली असतात, मात्र परिस्थिती सगळ्यांचीच एकसारखी कधीच नसते. त्यामुळे जिद्दी आणि कष्टाशिवाय काेणतही स्वप्न कधीच सत्यात उतरत नसत. त्यासाठी आयुष्यातील बराच काळ खर्च करावा लागताे, तेव्हाच स्वप्न पूर्ण हाेत असतात. गाेवे (ता.सातारा) येथील वैभव आनंदराव जाधव ( वय ३२) यांनी जिद्दी आणि कष्टाच्या जाेरावर लाेकसेवा आयाेगाच्या स्पर्धा परीक्षेत सुयश मिळवून राज्यात २७ वा क्रमांक मिळवून क्लासवन अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे त्यांचे सातारा जिल्ह्यातून काैतुक हाेत असून प्रेरणादायी प्रवासाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.