

Champion Maharudra honored with the ‘Pradeshadhyaksh Kesari’ title at Yamaidevi Yatra wrestling event in Kinhai.
Sakal
सातारारोड: किन्हई (ता. कोरेगाव) येथे साखरगड निवासिनी यमाईदेवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात कुर्डुवाडीच्या शिवराज कुस्ती संकुलनचा पैलवान महारुद्र काळेल ‘प्रदेशाध्यक्ष केसरी’चा मानकरी ठरला. त्याने प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकून मानाची गदा व एक लाखाचे बक्षीस पटकावले. पैलवान महारुद्र काळेल याने पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनचा पैलवान वैभव माने याला एकझॅक डावावर चितपट केले.