
सातारा : जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास येते. या प्रकारामुळे ग्रामीण भागात रात्री-अपरात्री रुग्णालयात आलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होत असे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहण्यासाठी जिओ फेसिंग अटेंडन्स (युबीआय सॉफ्टवेअर) ही प्रणाली कार्यान्वित केली होती.