Pritisangam Reflects the Powerful Legacy of Yashwantrao
Sakal
Ajit Pawar: प्रीतिसंगम अन् यशवंतरावांची ऊर्जा
दुष्काळग्रस्ताबाबत इंदापूर येथे केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या तीव्र चर्चांच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिल २०१३ मध्ये राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी एक दिवसाचे आत्मक्लेष उपोषण केले हाेते. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ही घटना विशेष लक्षवेधी ठरली हाेती. त्यानंतर श्री. पवार यांच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल झाल्याचे महाराष्ट्रानेही पाहिले. काेणतेही वक्तव्य करण्यापूर्वी त्याच्या परिणामाचे गांभीर्य ओळखून अजित पवार यांनी शब्द जपून वापरण्याची कला अवगत केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर कऱ्हाडकरांच्या मनात या घटनेच्या आठवणी आज पुन्हा एकदा ताज्या झाल्या.
- सचिन देशमुख, कऱ्हाड

