
Accident in Shinganwadi: Crab Hunting Turns Fatal for Young Man
Sakal
विंग/कोळे: वन्यप्राण्यांची घुसखोरी रोखण्यासाठी अवैध प्रवाहित वीजपुरवठा जोडून शेताभोवती लावलेल्या प्रवाहित तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू झाला. संबंधित युवक मित्रासमवेत खेकडे पकडण्यासाठी गेला असता शिंगणवाडी परिसरात काल मध्यरात्री ही दुर्घटना घडली. श्रीकांत केशव पुजारी (वय १८, रा. येणके, ता. कऱ्हाड) असे मृत युवकाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने येणके गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.