

The mangled bike and damaged Swift car at Mugav Phata where a fatal collision claimed one youth’s life.
Sakal
कोरेगाव : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गादरम्यान मुगाव फाट्याजवळ (ता. कोरेगाव) स्विफ्ट कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार युवक जागेवर ठार झाला असून, मोटरसायकलवर पाठीमागच्या सीटवर बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.