सुपनेत एक ठार; दैव बलवत्तर म्हणूनच चेतनचा जीव वाचला

सुपनेत एक ठार; दैव बलवत्तर म्हणूनच चेतनचा जीव वाचला

कऱ्हाड : मद्यधुंद कार चालकाचा ताबा सुटून कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सुपने (ता. कऱ्हाड) गावाजवळ हा अपघात झाला. कारचा वेग जास्त असल्याने अपघातानंतर दुचाकीचा चक्काचूर झाला, तर कार महामार्गाकडेला नाल्यात जाऊन पलटी झाली. संजय सुभाष गुरव (वय 44, रा. सुपने) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अजय शामराव हजारे (रा. पाटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. 

पोलिसांची माहिती अशी - सुपने येथील संजय गुरव हे कऱ्हाडहून दुचाकीवरून (एमएच 50 बी 8859) सुपने गावाकडे निघाले होते. ते गावानजीक पोचत असतानाच समोरून आलेल्या कारने (एमएच 50 एल 5433) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, की संजय गुरव हे दुचाकीसह काही अंतरावर फरपटत जाऊन लोखंडी रेलिंगजवळ पडले, तर कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाली. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी संजय गुरव यांना उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताबाबतची फिर्याद चेतन विजय पाटील (रा. सुपने) यांनी पोलिसात दिली आहे. हवालदार राजे तपास करीत आहेत. 

शेतकऱ्यांना दिलासा : मराठवाडीतून बुधवारपासून पाणी सोडणार

दैव बलवत्तर म्हणूनच... 

संजय गुरव यांच्यापासून काही अंतरावरच चेतन विजय पाटील हे दुचाकीवरून घराकडे निघाले होते. त्या वेळी समोरून येणारी कार वेडीवाकडी वळणे घेत आपल्याच दिशेने येत असल्याचे चेतनच्या निदर्शनास आली. त्याने तातडीने आपली दुचाकी साईडपट्टीवरून खाली घेत थांबवली. त्या वेळी कार त्याच्या दुचाकीला कट मारून समोरून येणाऱ्या संजय यांच्या दुचाकीला धडकली आणि त्यामध्ये संजय यांचा मृत्यू झाला. त्यामुळे दैव बलवत्तर म्हणूनच चेतनचा जीव वाचला. 

Gram Panchayat Results : क-हाड, फलटणला उमेदवारांचा आनंद पारावार; चिठ्ठीने जिंकविले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com