
कऱ्हाड : शहरातील बसस्थानकाकडून साईबाबा मंदिर ते भेदा चौक जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री नऊच्या सुमारास जुन्या वादातून एका युवकावर ब्लेडने वार करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. संशयितांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.