कऱ्हाड - पूर्ववैमनस्यातून पाठलाग करत धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून करण्यात आल्याची घटना आज शनिवारी सायंकाळी नांदलापूर (ता. कऱ्हाड) येथील डिसले गल्लीमध्ये घडली. प्रवीण ऊर्फ अप्पा सुभाष बोडरे (वय-३५, रा. बेघर वसाहत, जखिणवाडी, ता. कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.