

Primary school teachers presenting self-composed social awareness ovis under the ‘Navbharat Saksharta’ initiative in Jawali.
Sakal
-संदीप गाडवे
केळघर: नवभारत साक्षरता अभियानाचा प्रचार व प्रसार अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती जावळी व सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये तालुक्यातील चार प्राथमिक शिक्षिकांनी समाजप्रबोधनपर ओव्यांची निर्मिती केली. यातून अभियानात लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला असून, तो यशस्वी ठरला आहे.