

Historic ZP president’s bungalow set to undergo renovation and strengthening work.
sakal
सातारा : जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया येत्या काही महिन्यांत होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थान लवकरच नव्या रूपात झळकणार आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या वास्तूच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या कामाला हेरिटेज नियमावलीनुसार करण्यात येणार आहे. १९६४ मध्ये होमाई नरिमन कूपर यांच्याकडून सातारा जिल्हा परिषदेने हे निवासस्थान व संबंधित जागा खरेदी केली होती. त्यापासून जिल्हा परिषद अध्यक्षांचे येथे वास्तव्य सुरू आहे.