YouTube, Gmail Down: युट्यूब फसलंय आणि तुम्हालाच सांगतय काहीतर चुकतंय!

YouTube, Gmail Down: युट्यूब फसलंय आणि तुम्हालाच सांगतय काहीतर चुकतंय!
Updated on

जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल’मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत अन्य सेवांवर परिणाम झाला होता. सायंकाळी 5 पासून जवळपास तासभर या सेवा खंडीत झाल्या होत्या. त्यानंतर ही सेवा  पूर्ववत झाली आहे. Google च्या मालकीचे लोकप्रिय Youtube  सह Gmail अचानक डाउन झाले होते. भारतासह वेगवेगळ्या देशात ही अडचण येत होती. जेव्हा गुगलची सेवा डाउन होते तेव्हा कोट्यवधी युजर्संना मनस्ताप सहन करावा लागतो. युट्यूबचे महिन्याला  बिलियनहून अधिक युजर्स असतात.

भारतामध्येच नाही तर जगभरातील अनेक देशात गुगल सेवा बारगळली आहे. यासंदर्भातील तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहे. युट्यूबलर सर्च करताना त्रूटी पृष्ट दिसत असून काहीतरी चुकले आहे. असा संदेश पाहायला मिळाला. हा संदेश अनेकांना त्यांच्या मोबाईलचा किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, असे भासवू शकेल असाच होता. पण हा केवळ तुमचा नाही तर हा वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम होता. 

Gmail पेजवर तुमचे अकाउंट तात्पुरते उपलब्ध नाही, असा संदेश पाहायला मिळतो. 75 टक्के लोकांना लॉगिंन करतानाचा अडचणी येत होत्या. 15 टक्के लोक वेब साईटच अक्सेस करु शकत नव्हेत. जवळपास 8 टक्के लोकांना मेल रिसिव्हिंगचा प्रॉब्लेम आला.  युट्यूब वापरताना 54 टक्के युजर्संना अकाउंट एक्सेस करण्यात प्रॉब्लेम येत होता. तर जवळपास 42 टक्के युजर्संना व्हिडिओ पाहण्यात अडचणी आल्या. जवळपास 3 टक्के युजर्संना लॉगिंन करण्यामध्ये अडचणीचा सामना करावा लागला.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com