BSNL | बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये मिळेल 1000GB डेटा; किंमत अतिशय कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSNL

BSNL : बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये मिळेल 1000GB डेटा; किंमत अतिशय कमी

मुंबई : सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कमी किंमतीत जास्तीत जास्त लाभ देते. कंपनीकडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त योजना आहेत, ज्यामध्ये ते वापरकर्त्यांना कमी खर्चात बरेच फायदे देत आहेत.

BSNLच्या ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1000GB डेटा ऍक्सेस मिळत आहे. त्याच वेळी, जर आपण खासगी टेलिकॉम कंपन्यांबद्दल बोललो तर ते या किंमतीवर दररोज 2GB पेक्षा जास्त डेटा देत नाहीत. कंपनीचे हे दोन्ही प्लान ब्रॉडबँडसाठी आहेत. पहिल्या प्लानची किंमत 329 रुपये आणि दुसऱ्या प्लानची किंमत 399 रुपये आहे.

हेही वाचा: Jio recharge : ३ महिन्यांच्या प्लॅनमध्ये १५० रुपयांची सूट

बीएसएनएलचा 329 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

बीएसएनएलचा 329 रुपयांचा प्लॅन हा एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन आहे. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना 1000GB डेटा देत आहे. हा डेटा 20 Mbps स्पीडसह उपलब्ध आहे.

डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 2 एमबीपीएसपर्यंत घसरतो. त्याच वेळी, जर आपण इतर फायद्यांबद्दल बोललो तर, कंपनी या स्वस्त प्लॅनमध्ये डेटासह अमर्यादित व्हॉईस कॉलिंग ऑफर करत आहे.

हेही वाचा: Recharge plan : १९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळेल अमर्यादित कॉलिंग आणि डेटा

399 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

BSNL 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 Mbps स्पीडसह 1000GB डेटा देत आहे. 329 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे, डेटा मर्यादा संपल्यानंतर, या प्लॅनमध्ये इंटरनेट स्पीड 2 Mbps पर्यंत घसरतो. या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये कंपनी आपल्या वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा देखील देत आहे.

टॅग्स :BSNLDataInternet