First Human to Beat Tetris : कुणालाच जमलं नाही ते 13 वर्षांच्या मुलाने करुन दाखवलं, पूर्ण केली टेट्रिस गेम; पाहा व्हिडिओ

Gamer Beats Tetris : विलिस हा एक कम्पिटिटिव्ह गेमर आहे. टेट्रिस या पझल गेमच्या निन्तेंदो व्हर्जनमध्ये किल स्क्रीनपर्यंत पोहोचणारा हा पहिलाच मानव ठरला आहे.
First Human to Beat Tetris
First Human to Beat TetriseSakal

13 Year Old Gamer beat Tetris : कम्प्युटर गेम्सच्या सुरुवातीच्या काळातील एक प्रसिद्ध गेम म्हणजे 'टेट्रिस'. ही गेम आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीने पूर्ण केली नव्हती. मात्र, अवघ्या 13 वर्षांच्या एका गेमरने ही गेम पूर्ण करून इतिहास रचला आहे. आतापर्यंत ही गेम केवळ आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला पूर्ण करता आली होती.

विलिस गिब्सन असं या मुलाचं नाव आहे. 'ब्लू स्कुटी' (Blue Scuti) नावाने तो गेमिेंग करतो. विलिस हा एक कम्पिटिटिव्ह गेमर आहे. टेट्रिस (Tetris Game) या पझल गेमच्या निन्तेंदो (Nintendo) व्हर्जनमध्ये किल स्क्रीनपर्यंत पोहोचणारा हा पहिलाच मानव ठरला आहे. त्याने ही कामगिरी आणखी काही गेमर्ससमोर ऑनलाईनच पार पाडली.

या आठवड्यात त्याने यूट्यूबवर या कामगिरीचा व्हिडिओ (Tetris Game Finished) शेअर केला. सुमारे 40 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये जशीजशी गेम संपत जाते, तसं तसं विलिस अधिक खुश होत असल्याचं दिसत आहे. सलग गेम खेळून खेळून शेवटी आपली बोटं सुन्न पडल्याचंही तो सांगतो.

"आतापर्यंत कोणत्याही मानवाने हा रेकॉर्ड केलेला नाही. काही वर्षांपूर्वी याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र हे अशक्य असल्याचं सर्वांना वाटत होतं", असं मत क्लासिक टेट्रिस वर्ल्ड चॅम्पियनशिपचे अध्यक्ष व्हिन्स क्लेमेंते यांनी व्यक्त केलं. न्यूयॉर्क टाईम्सने याबाबतंच वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

First Human to Beat Tetris
Video Game : आता व्हिडिओ गेम करणार मुलांचा मानसिक इलाज, कंपनीचा मोठा दावा; अमेरिका सरकारने दिली परवानगी

काय आहे गेम?

टेट्रिस या गेममध्ये (What is Tetris Game) स्क्रीनवर विविध आकारांमधील काही ब्लॉक्स खाली पडत असतात. गेमरला हे ब्लॉक अशा प्रकारे एकावर एक पडू द्यायचे असतात, जेणेकरून सगळ्यात खाली त्यांची एक ओळ तयार होईल. ही ओळ तयार झाल्यास ती गायब होते.

जसं जसं गेम पुढे जाते, तसं तसं वरुन पडणाऱ्या ब्लॉक्सची गती वाढत जाते. यामुळे खेळाडूला विचार करण्यासाठी अगदी कमी वेळ मिळतो. 29व्या लेव्हलनंतर ही गती एवढी वाढते, की माणसांना त्यावर प्रतिक्रियाच देता येत नाही. मात्र, विलिसने तब्बल 157 लेव्हल खेळून ही गेम पूर्ण केली.

First Human to Beat Tetris
Chinese Gaming Apps : लहान मुलांच्या गेमिंग अ‍ॅप्समधून चीन चोरतंय भारतीयांची खासगी माहिती; पाहा संपूर्ण यादी

विशेष म्हणजे, टेट्रिस या गेमला यावर्षी 40 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विलिसची ही कामगिरी आणखी खास ठरत आहे. टेट्रिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माया रॉजर्स यांनीही याबाबत विलिसचे अभिनंदन केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com