

iPhone 1 vs. Today: What Changed ?
esakal
Apple’s First Ever iPhone: आज आपल्या खिशात असलेला आयफोन हा एखाद्या पॉवरफुल कॉम्प्युटरसारखा काम करतो. पण, अॅपलच्या सर्वात पहिल्या आयफोनबद्दल तुम्हाला माहिती आहे का ? १८ वर्षांपूर्वी म्हणजेच ९ जानेवारी २००७ ला अॅपलचे संस्थापक आणि सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील एका कार्यक्रमात जगातील पहिला आयफोन (iPhone 1st Generation) प्रेझेंट केला होता आणि २९ जून २००७ ला तो बाजारात आला होता.स्टीव्ह जॉब्स यांनी या फोनचे वर्णन 'थ्री-इन-वन' डिव्हाइस असे केले होते. यात आयपॉड (iPod), मोबाईल फोन आणि इंटरनेट कम्यूनिकेशन अशा तिन्ही गोष्टी एकत्र देण्यात आल्या होत्या. आजच्या आधुनिक आयफोनच्या तुलनेत तो कसा होता आणि त्यात काय बदल झाले हे पहा..