esakal | लँड रोव्‍हर डिफेण्‍डरला 'वर्ल्‍ड कार डिझाइन ऑफ दि इअर'चा पुरस्कार

बोलून बातमी शोधा

लँड रोव्‍हर डिफेण्‍डरला 'वर्ल्‍ड कार डिझाइन ऑफ दि इअर'चा पुरस्कार
लँड रोव्‍हर डिफेण्‍डरला 'वर्ल्‍ड कार डिझाइन ऑफ दि इअर'चा पुरस्कार
sakal_logo
By
प्रणीत पवार

मुंबई : लँड रोव्‍हरच्या 'डिफेण्‍डर' कारने वार्षिक वर्ल्‍ड कार अवॉर्ड्स 2021च्या 'वर्ल्‍ड कार डिझाइन ऑफ दि इअर' पुरस्कारावर नाव कोरले आहे. लँड रोव्‍हरने सलग तिसऱ्यांदा हा पुरस्‍कार जिंकला आहे. यापूर्वी 'वेलार' (२०१८) व 'इवोक' (२०१२) या गाड्यांना हा पुरस्‍कार मिळाला होता.

वर्ल्‍ड कार डिझाइन ऑफ दि इअर' पुरस्कारासाठी वर्षभरात उल्‍लेखनीय ठरलेल्या वाहनांना नामांकन मिळते. परीक्षकांनी डिफेण्‍डरची वैशिष्‍ट्यपूर्ण डिझाइन, व्‍यापक ऑफ-रोड क्षमता, सर्वोत्तम ऑन-रोड गतीशीलता आणि २१व्‍या शतकातील व्‍यवहार्यता व कनेक्‍टीव्‍हीटी यांचे कौतुक केले आहे.

डिफेण्‍डरने ७० वर्षांहून अधिक काळापासून हॉलमार्क राहिलेल्‍या लँड रोव्‍हरला नवा उत्‍साह दिला आहे. ही गाडी बॉडी डिझाइन्‍सच्‍या निवडीसह उपलब्‍ध आहे. 'अंतर्गत रचना, तंत्रज्ञान व डिझाइनसह ऑफ-रोड क्षमता कायम राखत २१ व्‍या शतकातील डिफेण्‍डर निर्माण करण्‍याचा दृष्टिकोन होता, असे जग्‍वार लँड रोव्‍हरचे मुख्‍य अधिकारी प्रा. गेरी मॅकगव्‍हर्न ओबीई यांनी सांगितले.

डिफेण्‍डर ११० पाच, सहा किंवा ५+२ आसनांमध्ये उपलब्ध आहे. तर डिफेण्‍डर ९० फॅमिली हॅचबॅकमध्‍ये ६ प्रवासी सामावण्याची क्षमता आहे. डिफेण्‍डरने आतापर्यंत ५० हून अधिक जागतिक पुरस्‍कार जिंकले आहेत, ज्‍यामध्‍ये 'टॉप गिअरचा २०२० कार ऑफ दि इअर', 'मोटर ट्रेण्‍डचा २०२१ एसयूव्‍ही ऑफ दि इअर' आणि 'ऑटोकारचा बेस्‍ट एसयूव्‍ही २०२०' अशा प्रतिष्ठित पुस्‍कारांचा समावेश आहे.

किंमत आणि फीचर्स

डिफेण्डरला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये लाँच केले होते. ७३.९८ लाख रुपये (एक्स-शोरूम) ही तिची सुरुवातीची किंमत होती. यामध्ये २.० लिटर पेट्रोल इंजिन दिले असून, ती २९६ बीएच पॉवर, ४०० एनएम टॉर्क जनरेट करते. डिफेण्डर ३.० लिटर डिझल इंजिनमध्येही उपलब्ध असून, ती २९६ बीएच पॉवर, ६५० एनएम टॉर्क जनरेट करते. ऑल-व्हील-ड्राइवसह डिफेण्डरचे दोन्ही इंजिन ८ स्पिड ऑटोमेटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहेत. डिफेण्डरने यूरो एनसीएपी क्रैश टेस्टमध्ये ५ रेटिंग प्राप्त केली आहे.

संपादन : शर्वरी जोशी