प्रतीक्षा संपली! मारुतीच्या 2022 Ertiga चे प्री-बुकिंग सुरू, वाचा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2022 maruti suzuki ertiga facelift bookings open in rs 11000 from today check details

प्रतीक्षा संपली! मारुतीच्या 2022 Ertiga चे प्री-बुकिंग सुरू, वाचा डिटेल्स

2022 Maruti Suzuki Ertiga : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ने त्यांच्या लोकप्रिय MPV Ertiga च्या 2022 मॉडेलचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन 2022 Maruti Suzuki Ertiga चे फेसलिफ्ट बुकिंग फक्त 11,000 रुपयांमध्ये करू शकता. कंपनीने आगामी नवीन Ertiga चा अधिकृत फोटो टीझर देखील जारी केला आहे. कंपनी लवकरच या MPV ची तिसरी जनरेशन बाजारात आणणार आहे.

डिझाइनमध्ये बदल होण्याची चिन्हे

नवीन मारुती सुझुकी एर्टिगा फेसलिफ्ट (Maruti Suzuki Ertiga facelift) साठी फक्त एक टीझर इमेज जारी करण्यात आली आहे. यामध्ये, नवीन मॉडेलला स्पेशल बॉडी लाइनसह नवीन फ्लुइडिक डिझाइन देण्यात आल्याचे दिसून येत आहे. नवीन 3D ग्लॉसी फिनिश ग्रिल देखील समोर दिसत आहे. कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर त्यातही बरेच बदल पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे.

K-Series मध्ये 1.5-लीटर ड्युअल जेट इंजिन दिले जाईल

काही रिपोर्टनुसार नेक्स्ट-जनरल एर्टिगा नेक्स्ट-जनरल के-सीरीज 1.5 लीटर ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन दिले जाईल . मारुती सुझुकीची नेक्स जनरेशन एर्टिगा प्रोग्रेसिव्ह स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह ड्युअल व्हीव्हीटी इंजिनवर चालेल. इंजिनला पॅडल शिफ्टर्स आणि एडव्हांस 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल.

हेही वाचा: वसुली प्रकरण: अनिल देशमुखंच मुख्य आरोपी; ED ची हायकोर्टात माहिती

750,000 पेक्षा जास्त ग्राहक

मारुती अर्टिगाचे सध्या देशात 7,50,000 पेक्षा जास्त ग्राहक आहेत. CNG मध्ये आधीच उपलब्ध असलेली Ertiga संपूर्ण MPV मार्केटमध्ये एक प्रकारे गेम चेंजर ठरली आहे. असा विश्वास व्यक्त केला जात आहे की नेक्स्ट-जनरल एर्टिगा ग्राहकांना अधिक मायलेज, शक्तिशाली इंजिन, एडव्हांस तंत्रज्ञान आणि स्टाइलीश एक्सपिरिएंस देईल.

हेही वाचा: सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हिडिओवर शशी थरूर यांचं स्पष्टिकरण, म्हणाले..

Web Title: 2022 Maruti Suzuki Ertiga Facelift Bookings Open In Rs 11000 From Today Check Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Automobilemaruti suzuki
go to top