esakal | स्मार्ट वॉच ३६० : ऑक्सिजन पातळीची माहिती देण्यासह हृदयाची गती करते मॉनिटर
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट वॉच ३६० : ऑक्सिजन पातळीची माहिती देण्यासह हृदयाची गती करते मॉनिटर

स्मार्ट वॉच ३६० : ऑक्सिजन पातळीची माहिती देण्यासह हृदयाची गती करते मॉनिटर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्मार्टफोनच्या जमान्यातही घड्याळ घालणाऱ्यांची कमी नाही. मोबाइलमध्ये टाइम पाहता येत असला तरी घड्याळ घालणारे दिसून येतात. यावरून हँड वॉचची आजही किती किंमत आहे, हे दिसून येते. यामुळेच की काय फायर बोल्टने ‘फायर-बोल्ट 360’ (Fire-bolt 360) अशी अनोखी स्मार्टवॉच (Smart watch) भारतीय बाजारात आणला आहे. फायर-बोल्टने अभिनेता विक्की कौशलला (Actor Vicky kaushal) ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. (four-ways-to-clean-and-speed-up-your-laptop-windows-startup-disk-cleanup-temp-files-ram)

फायर-बोल्ट 360 मध्ये या स्मार्टवॉचमध्ये एसपीओ २ मॉनिटर आहे. हे मॉनिटर रक्ताच्या ऑक्सिजन पातळीची माहिती प्रदान देतो. याशिवाय यात २४4x७ हृदय गती मॉनिटर आणि रक्तदाब ट्रॅकर देखील आहे. या स्मार्टवॉचमध्ये मेडिटिव्ह ब्रेथिंग वैशिष्ट्य देखील आहे. जे तणावमुक्त आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कार्डियाक मेट्रिक्स व्यतिरिक्त, स्मार्टवॉचमध्ये फिरणारे यूआय इंटरफेस देखील असतो जे मोड, फोल्डर्स आणि अ‍ॅप्समध्ये सहजपणे टॉगल करण्यास अनुमती देतात.

हेही वाचा: एकेकाळी हसते खेळते असलेले आमचे नगर आज विरान आहे, साहेबऽऽ

फायर-बोल्ट 360 मध्ये हाय डेफिनिशन मोठी स्क्रीन, टिकाऊ मेटल बॉडी आहे. स्मार्टवॉचमध्ये बॅटरी आहे जी पूर्णपणे चार्ज झाल्यावर कमीतकमी ८ दिवस चालते. यात पूर्ण पावर स्टँडबाय असल्याने वीस दिवसांपर्यंत त्याची शक्ती संरक्षित केली जाऊ शकते. तसेच यात विविध प्रकारचे वॉच फेस आणि स्पोर्ट्स मोड आहेत. आम्ही आमच्या नवीनतम स्मॅर्टवॉचला प्रोत्साहन देण्यासाठी विक्की कौशलची निवड केली आहे. कारण, तो एक प्रेरणादायक आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व आहे. त्याच्याद्वारे प्रत्येक तरुण भारतीयांना वेगवेगळ्या पातळीवर जोडले जाईल, असे फायर-बोल्टचे सह-संस्थापक आयुरी आणि अर्णव किशोर म्हणाले.

किंमत फक्त ३,४९९ रुपये

फायर-बोल्टी 360 हा स्मार्टवॉच युवा भारतीयांचा मित्र आहे. याद्वारे आरोग्य कोठेही निरीक्षण करता येईल. तसेच गेम्समुळे त्यांचेही मनोरंजन केले जाईल. यात रोटोटिंग मेनू आणि दोन हजारांपेक्षा अधिक गेम्स आहेत. या स्मार्टवॉचची किंमत फक्त ३,४९९ रुपये आहे.

(four-ways-to-clean-and-speed-up-your-laptop-windows-startup-disk-cleanup-temp-files-ram)

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे