Online Shopping: शॉपिंग करताना 'या' टिप्स करा फॉलो, Flipkart-Amazon वर निम्म्या किंमतीत मिळतील वस्तू

फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन सारख्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवरून आपण सातत्याने खरेदी करत असतो. मात्र, या साइटवरून खरेदी करताना काही टिप्स फॉलो करायला हव्या.
Online Shopping
Online Shoppingsakal

Online Shopping Tips: गेल्याकाही वर्षात ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. सहज उपलब्ध असलेले इंटरनेट व प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने ऑनलाइन शॉपिंग सहज शक्य झाली आहे. मात्र, ऑनलाइन शॉपिंग करताना काही विशेष टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. या टिप्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचाः काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

क्रेडिट कार्डचा करा वापर

शॉपिंग करताना डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. क्रेडिट कार्डवर सर्वाधिक ऑफर असतात. तर डेबिट कार्ड्सवर जास्त ऑफर्सचा फायदा मिळत नाही. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना ऑफरचा फायदा घ्यायचा असल्यास क्रेडिट कार्डचा नक्की वापर करा.

ठराविक दिवशी करा शॉपिंग

ऑनलाइन शॉपिंग करताना बंपर डिस्काउंट हवे असल्यास आठवड्याच्या शेवटी खरेदी करणे टाळावे. कारण, शनिवार-रविवार बहुतांशजण खरेदी करत असतात. अशावेळी, ऑनलाइन खरेदी करताना डिस्काउंटचा फायदा मिळण्याची शक्यता खूप कमी असते. वर्किंग डेजमध्ये शॉपिंग करत असाल तर अतिरिक्त डिस्काउंट मिळण्याची शक्यता जास्त असते.

Online Shopping
Smartphone Offer: १५ मिनिटात फुल चार्ज होणाऱ्या ५जी फोनवर हजारो रुपयांची सूट, मिळतो १०८MP चा दमदार कॅमेरा

कार्टमध्ये अ‍ॅड करू नका प्रोडक्ट

शॉपिंग करताना एखादी वस्तू आवडल्यास कार्टमध्ये टाकून ठेवू नये. अनेकदा कार्टमध्ये प्रोडक्ट अ‍ॅड करून ठेवल्यास काही दिवसांनी त्याच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळेल. यामागे कारण नक्की काय आहे, हे लक्षात येत नाही. परंतु, असे अनेकांसोबत झाले आहे. तुम्हाला एखादी वस्तू आवडली व किंमत कमी असल्यास त्वरित खरेदी करावे. अतिरिक्त डिस्काउंटच्या नादात नंतर किंमत वाढल्याचे देखील पाहायला मिळते.

बँकेच्या कार्डचा करा वापर

वेगवेगळ्या बँका व कंपन्या कार्ड्सवर खास ऑफर देत असता. अशा कार्ड्सचा शॉपिंग करताना वापर केल्यास तुम्हाला कॅशबॅकचा फायदा मिळतो व पैशांची देखील बचत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com