स्मार्टफोन्सवर मिळतोय तब्बल 5 हजारांचा डिस्काऊंट!

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 मार्च 2020

5000 रुपयांपर्यंत डिस्काउंट

नवी दिल्ली : प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट अ‍ॅमेझॉनवर Vivo Carnival Sale सुरु झाला आहे. या सेलमध्ये विवोच्या सगळ्या स्मार्टफोन्सवर मोठा डिस्कांउट देण्यात येत आहे. हा सेल 19 मार्चपर्यंत सुरु असणार आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

Vivo Carnival Sale च्या ऑफरनुसार, विवोच्या Vivo Y11, Vivo Y12, Vivo Y15, Vivo Y19 या Y सीरीजवर 6 महिन्यापर्यंत नो कॉस्ट EMI च्या पर्यायासह उपलब्ध आहेत. Vivo U सीरीजवर 3000 रुपयापर्यंत डिस्कांउट मिळत आहे. तसेच Vivo कार्निवल सेलमध्ये वीवो U20 चा स्मार्टफोन, 4GB+64GB वेरियंट 10,999 रुपये आणि तर 6GB+64GB वेरियंट 11,990 रुपये किमतीत उपलब्ध असणार आहे. तर U10 फोन या सेलमध्ये 8,990 रुपयांना खरेदी करता येईल.

खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; नवे दर...

Vivo S1 सीरीज 4000 रुपयांपर्यंत डिस्काउंट सेलमध्ये S1 प्रो च्या 8GB+128GB वेरियंट वर 2000 रुपये डिस्काउंट आहे. त्याची किंमत 18,990 रुपयापर्यंत असणार आहे. विवो S1 चा 6GB+128GB वेरियंट 17,900 रूपये तर 4GB+128GB वेरियंट हा 15,990 रुपयांत उपलब्ध असणार आहे. तसेच 6GB+128GB वेरियंटचा स्मार्टफोन 16,990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. 

5000 रुपयांपर्यंत डिस्काउंट

Vivo V17 या स्मार्टफोनची मूळ किंमत 27,990 रुपये इतकी आहे. पण Vivo च्या Vivo Carnival Sale मध्ये हा स्मार्टफोन पाच हजारांच्या डिस्काउंटसह 22,990 रुपयांना विकत घेता येणार आहे. ही किंमत 8GB RAM+128GB वेरियंटच्या फोनची आहे. डिस्काउंटशिवाय हा फोन नो कॉस्ट EMI सोबत खरेदी करता येईल. या फोनच्या खरेदीसोबत अतिरिक्त एक्सचेंज ऑफरचा फायदाही घेता येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5000 Discount On Vivo Smartphones In Vivo Carnival Sale