नेटकऱ्यांनो सांभाळा, हॅकिंगचे वाढले प्रमाण

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जून 2016

पिंपरी - माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देश झपाट्याने प्रगती करत असल्याचे चित्र दिसत असले, तरी दुसरीकडे दुबळ्या सायबर सुरक्षेमुळे संकेतस्थळ (वेबसाइट) "हॅक‘ करण्याचे प्रमाण प्रत्येक वर्षाला वाढत असल्याचे समोर आले आहे. या वर्षात जानेवारी ते मार्च 2016 या कालावधीत देशात सात हजार 677 वेबसाइट हॅक झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत सहा हजार 177 वेबसाइट हॅक झाल्या होत्या. यंदा ते प्रमाण दीड हजारने वाढले आहे. त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या 50 वेबसाइटचा समावेश आहे. ही आकडे नेटकरी मंडळींना सावधानतेचा इशारा देणारी आहे.

गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत देशभरात 26 हजार 254 वेबसाइट हॅक झाल्या होत्या. त्यामध्ये "डॉट इन‘ने नोंदणी असणाऱ्या 18 हजार 403 वेबसाइटचा समावेश होता. यंदाही अशा पाच हजार 190 वेबसाइटचा समावेश आहे. गेल्या वर्षी देशभरात डिसेंबरमध्ये तीन हजार 950 तर आतापर्यंतच्या तीन महिन्यांपैकी जानेवारीमध्ये तीन हजार 437 वेबसाइट हॅक झाल्याची माहिती केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम विभागाकडून समोर आली आहे.

सायबर सुरक्षेत अनेक त्रुटी असल्यामुळे वेबसाइट हॅक होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे सायबरतज्ज्ञ डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी सांगितले. ते म्हणाले, ""नवीन वेबसाइट तयार करताना त्याच्या सुरक्षेचे ऑडिट करण्याची आवश्‍यकता असते. सॉफ्टवेअर कोडिंग करताना त्यात अनेक त्रुटी राहतात, त्याचे टेस्टिंग होत नाही. वेबसाइट अपलोड करताना ऍन्टीव्हायरस, फायरवॉल, याची तपासणी केली जात नाही. त्यामुळे वेबसाइट हॅकिंगचे प्रकार होतात.‘‘

गेल्या चार वर्षांमध्ये देशात हॅक झालेल्या वेबसाइटची आकडेवारी
वर्ष हॅक झालेल्या वेबसाइटची संख्या
2012-13 28 हजार 481
2013-14 32 हजार 323
2014-15 26 हजार 254
जानेवारी ते मार्च 2016 7 हजार 677 

Web Title: 7677 Indian websites have been hacked

टॅग्स
फोटो गॅलरी