ChatGPT : चॅटजीपीटीचा पहिला लाभार्थी सापडला! केवळ सात तासांच्या क्लासेसमधून कमावतो लाखो रुपये |a man earned money from ChatGPT Guide Classes | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ChatGPT

ChatGPT : चॅटजीपीटीचा पहिला लाभार्थी सापडला! केवळ सात तासांच्या क्लासेसमधून कमावतो लाखो रुपये

- गायत्री सुधाकर तौर

ChatGPT : मॅन v/s मशीन ही जुगल बंदी वर्षांनुवर्षे चालत आलीये. आता यात ओपन-एआय (OpenAi) या अमेरिकन स्टार्टपने चॅटजीपीटी (ChatGPT) ची निर्मिती करून यात अजून भर घातली आहे. यामुळे मानवी जीवन सोपं केलं की अवघड, विषयी अनेक चर्चा रंगतायेत.

गेल्या वर्षीच्या अखेरीस मायक्रोसॉफ्ट कंपनी फंडेड ओपन-एआय (OpenAi) या अमेरिकन स्टार्टपने चॅटजीपीटी(ChatGPT) ला लॉन्च केल्यापासूनच, या चॅटबॉट आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (artificial intelligence) ला कोणी पसंती दाखवली आहे तर कोणी चिंता व्यक्त केली आहे.

अलिकडेच एका हिन्दी न्युज चॅनलवर एआय न्युज अँकरने अँकरींग केली, म्हणून आता माणसांची जागा एआयने घेतली तर नोकरी जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

कधी डेटा चोरीमुळे असो, तर कधी मुलं आपले होमवर्क या चॅटबॉट आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीनं पुर्ण करतात, अशा अनेक कारणांमुळे चॅटजीपीटी(ChatGPT)ला ब्लॉक करण्याचा निर्णय न्यूयॉर्कच्या स्कूल्सनी घेतला होता आता त्यानंतर इटलीच्या डेटा प्रोटेक्शन ॲथोरिटीनेही घेतला.

युनेस्को (UNESCO) ने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (artificial intelligence) वर ग्लोबल एथिकल फ्रेमवर्क बनवण्याची मागणी केली. मात्र याआधी इलॉन मस्कसहीत आणखी १००० टेक्नोलॉजी दिग्गजांनी एआय वर होणाऱ्या सतत विकसनशीलतेवर बंदी लावण्याची मागणी करत ओपन लेटर लिहिले.

एवढं सगळ सुरू असताना, जिथे एकीकडे लोक आपलं काम सोपं करण्यासाठी या चॅटजीपीटीचा वापर करताहेत तर दुसरीकडे आपली शक्कल लढवत ऑस्टिनला राहणाऱ्या लान्स जंक याच चॅटजीपीटीला कमाईचे साधन बनवून लाखो रूपये कमवत आहे.

गेल्या वर्षीच्या अखेरीस लान्स जंकने A Complete ChatGPT Guide for Beginners असा ऑनलाइन कोर्स सुरू केला. या कोर्स मध्ये लोकांना ChatGPT वापरण्यास शिकवलं जात. अवघ्या तीन महिन्यात या कोर्सला १५,००० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. हा बॉट सर्वांना उपलब्ध व्हावा अशी इच्छा लान्स ने व्यक्त केली.

लान्स जंक म्हणतो, “मला असे वाटते की लोक ChatGPT ला घाबरतात, म्हणून मी ते अधिक इंटरेस्टींग आणि उत्साही बनवण्याचा प्रयत्न केलाय”.

लान्स जंकचा कोर्स 7 तासांचा असून त्याची किंमत $20 आहे ज्यात 50 लेक्चरसचा समावेश आहे. या कोर्स मुळे लान्स जंकला $34,913 (सुमारे 28.6 लाख रुपये) नफा झाल्याचे बोलले जाते.

मॅन v/s मशीन या जुगलबंदीमध्ये होणाऱ्या या बदलचा स्वीकार करायचा की याला घाबरायचं? हा प्रश्न उभा राहतो मात्र एआयला जन्म मनुष्यानेच दिलाय याचा विसर पडू नये, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :TechnologyTechnical