Tesla Autopilot: टेस्लाने अखेर नमतं घेतलं! ऑटोपायलट मोडवर अपघातात मृत्यू, भरपाई मागणाऱ्या पीडिताच्या कुटुंबियांशी तडजोड

Tesla Cars: कुटुंबाने इलॉन मस्कच्या कंपनीवर आपल्या कारच्या ऑटोपायलट सिस्टमबद्दल ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आणि जाणूनबुजून "दोषयुक्त" फिचर्स दिल्याचा आरोप केला.
Tesla Car's Autopilot Mode
Tesla Car's Autopilot ModeEsakal

Tesla Car's Autopilot Mode:

इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाने सहा वर्षांपूर्वी झालेल्या कार अपघाताती पीडितेच्या कुटुंबाशी समझोता केला आहे. सोमवारी न्यायालयीन कागदपत्रांमध्ये ही बाब उघड झाली. असा दावा अनेक मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

या प्रकरणातील ज्युरी खटला पुढील आठवड्यापासून सुरू होणार होता, ज्यामध्ये टेस्ला कंपनीवर मार्केटिंग दरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

कुटुंबाने इलॉन मस्कच्या कंपनीवर आपल्या कारच्या ऑटोपायलट सिस्टमबद्दल ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आणि जाणूनबुजून "दोषयुक्त" फिचर्स दिल्याचा आरोप केला.

2018 मध्ये, अभियंता वेई लुन हुआंगचा कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली परिसरात कार अपघातात मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी वेई लुन हुआंग हे टेस्ला कंपनीच्या मॉडेल एक्स कारमध्ये होते अपघातावेळी, वेई यांची कार ऑटोपायलट मोडवर होती, परंतु ती नियंत्रणाबाहेर गेली आणि दुभाजकाला धडकली, परिणामी वेई यांचा मृत्यू झाला.

टेस्ला कंपनीने कारच्या सुरक्षेबाबत दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत वेई यांच्या कुटुंबीयांनी खटला दाखल केला. आता टेस्लाने पीडितेच्या कुटुंबाशी समझोता केल्याचे बोलले जात आहे. मात्र, या कराराअंतर्गत पीडितेच्या कुटुंबीयांना किती रक्कम मिळणार याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही.

Tesla Car's Autopilot Mode
Anand Mahindra : अ‍ॅलेक्साच्या मदतीने माकडापासून केला बचाव, चिमुरडीच्या हुशारीवर खुश झाले आनंद महिंद्रा! थेट दिली जॉब ऑफर

वेई यांच्या कुटुंबाने टेस्लाविरुद्ध दाखल केलेल्या दाव्यात असे म्हटले आहे की, टेस्लाच्या मॉडेल एक्स कारबाबत असे दावे करण्यात आले होते की, ऑटोपायलट मोडमध्ये ही कार चालकासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. कार सुरक्षित वेगाने धावते, केवळ नियुक्त लेनमध्येच चालते आणि महामार्गावर चालवताना इतर वाहनांना धडकत नाही, परंतु हे दावे खोटे ठरले.

अपघाताच्या वेळी कारच्या सॉफ्टवेअरने वेई हुआंगला अलर्ट जारी करून स्टीयरिंग व्हील धरण्यास सांगितले होते, असे तपासात उघड झाले आहे. टेस्ला देखील दावा करते की त्याच्या कारची सुरक्षा वैशिष्ट्ये ठीक आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की ड्रायव्हरने लक्ष देऊ नये.

Tesla Car's Autopilot Mode
Elon Musk : इलॉन मस्क पुन्हा गोत्यात! कोर्टाचे आदेश मानण्यास नकार; म्हणाला 'पैशांपेक्षा तत्व महत्त्वाचं'

वॉशिंग्टन पोस्टने विश्लेषित केलेल्या नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन (NHTSA) डेटानुसार, टेस्लाचे ऑटोपायलट सॉफ्टवेअर 2019 पासून एकूण 17 मृत्यू आणि 736 अपघातामध्ये सहभागी आहे.

अधिकृतपणे, Telsa ने ऑटोपायलटचे वर्णन "एक SAE लेव्हल 2 ड्रायव्हिंग ऑटोमेशन सिस्टम म्हणून केले आहे जे ड्रायव्हरला ड्रायव्हिंगसाठी मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com