Aditya L1 आणि Proba-3 आले एकत्र! 2025 मध्ये राबवणार सूर्य निरीक्षण मोहिम, नेमकं काय असणार खास?

Aditya L1 and Proba 3 collaboration : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) यांच्या सहकार्याने आदित्य L1 आणि Proba-3 मोहिमा राबवणार आहेत.
Aditya L1 Proba 3 joint Solar observations 2025
Aditya L1 and Proba 3 collaborationesakal
Updated on

Aditya L1 Proba 3 joint Solar observations 2025 : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) यांच्या सहकार्याने आदित्य L1 आणि Proba-3 मोहिमा 2025 पासून संयुक्त सूर्य निरीक्षण मोहिमा राबवणार आहेत. या दोन्ही मोहिमांचे मुख्य साधन कोरोनाग्राफ आहे. हे उपकरण सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाला अडवून त्याच्या बाह्य भागाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

आदित्य L1 सूर्य अभ्यास मोहिम

भारतीय अंतराळ संस्थेने सप्टेंबर 2023 मध्ये आदित्य L1 हे पहिले सूर्य निरीक्षण मिशन प्रक्षेपित केले. हे यान पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावरील लॅग्रेंज बिंदू L1 वर कार्यरत आहे. या मोहिमेत Visible Emission Line Coronagraph (VELC) नावाचे उपकरण बसवले आहे, जे सूर्याच्या बाह्य वर्तुळाचा अभ्यास करण्यात मदत करते.

Proba-3 मिशन

Proba-3 हे ESA चे पहिले असे मिशन आहे, ज्यामध्ये दोन उपग्रह एकत्रितपणे कार्यरत असतील. या उपग्रहांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते सूर्यग्रहणासारखी परिस्थिती निर्माण करून सूर्याच्या कोरोना वर्तुळाचा जवळून अभ्यास करतील. Proba-3 च्या Association of Spacecraft for Polarimetric and Imaging Investigation of the Corona of the Sun (ASPIICS) उपकरणामुळे सूर्याच्या आंतरिक व बाह्य कोरोना यामधील क्षेत्राचा अचूक अभ्यास शक्य होईल.

Aditya L1 Proba 3 joint Solar observations 2025
Coffee Benefits : कॉफी प्यायल्याने आयुष्य वाढतं! दूर राहतात 'हे' 10 आजार, संशोधनातून समोर आली आश्चर्यकारक माहिती

आदित्य L1 आणि Proba-3 यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी चेन्नई येथे नुकतीच विज्ञान कार्यसंघाची बैठक झाली. या बैठकीत आदित्य L1 च्या निरीक्षणांमध्ये Proba-3 ची मदत कशी घेतली जाईल यावर चर्चा झाली. भारतीय वैज्ञानिक डॉ. दिपांकर बॅनर्जी यांनी सांगितले की, “Proba-3 च्या विशिष्ट निरीक्षण कालावधीत संयुक्त मोहिमा राबवल्या जातील. यामुळे दोन्ही संस्था आणि वैज्ञानिकांना लाभ होईल.”

Proba-3 चे प्रक्षेपण आणि पुढील वाटचाल

5 डिसेंबर रोजी प्रक्षेपित झालेल्या Proba-3 मोहिमेचे उपग्रह सध्या त्यांच्या प्राथमिक चाचण्या आणि कॅलिब्रेशन टप्प्यात आहेत. यामधील Digital Absolute Radiometer (DARA) उपकरण सूर्याच्या उर्जेचे सातत्याने मोजमाप करण्यासाठी लवकरच कार्यरत होईल. 2025 च्या सुरुवातीला हे उपग्रह स्वतंत्रपणे कार्य सुरू करतील आणि कोरोना अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या निरीक्षणांची सुरुवात होतील.

Aditya L1 Proba 3 joint Solar observations 2025
Order Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर कॅन्सल करताय? आता द्यावे लागणार चक्क इतक्या रुपयांचे शुल्क, फ्लिपकार्ट अन् मिंत्राचे नवे नियम पाहा

भारत-युरोप सहकार्याचा नवा अध्याय

आदित्य L1 आणि Proba-3 यांच्या संयुक्त मोहिमा सूर्य अभ्यासात नवा दृष्टिकोन मिळेल. भारतीय आणि युरोपियन शास्त्रज्ञांचे हे सहकार्य भविष्यातील अवकाश संशोधनाला अधिक समृद्ध करेल. 2025 मध्ये सूर्याच्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी दोन्ही मोहिमा एकत्र कसा महत्त्वाचा टप्पा गाठतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com