esakal | अल्टोपेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक कार, फुल चार्जमध्ये चालेल 300km
sakal

बोलून बातमी शोधा

Nano EV

अल्टोपेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक कार Nano EV, फुल चार्जमध्ये चालेल 300km

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सध्या जगभरात इलेक्ट्रीक कारची मागणी वाढत आहे, अनेक कार कंपन्यांकडून इलेक्ट्रीक कार लॉंच करत आहेत. चीनची कार निर्माता कंपनी Wuling HongGuang ने त्यांची मिनी इलेक्ट्रिक बाजारत घेऊन येत आहे. या कारचे नाव Nano EV असेल. काही रिपोर्टनुसार ही कार केवळ सर्वात लहान इलेक्ट्रिक कार असणार नाही तर ती जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार देखील असू शकते. चला तर मग जाणून घेऊयात या कारबद्दल सविस्तर..

CarNewsChina च्या रिपोर्टनुसार, Nano EV ची किंमत 20 हजार युआन (सुमारे 2.30 लाख रुपये) पेक्षा जास्त असणार नाही. याचा म्हणजेच की, Nano EV ची किंमत ही भारतीय मारुती अल्टोपेक्षा देखील कमी असू शकते. एवढेच नाही तर चीनमधील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार Wuling Hongguang Mini EV पेक्षा Nano EV नक्कीच स्वस्त असेल.

हेही वाचा: महिंद्रा Xuv700 ची बुकिंग 'या' तारखेला होणार सुरू, पाहा डिटेल्स

300 किमीची रेंज

या कारची टॉप स्पीड 100 किमी प्रतितास असेल, तर यामध्ये नॅनो EV IP67- सर्टिफाइड 28 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. या छोट्या इलेक्ट्रिक कारला एका चार्जवर 305 किमीची रेंज मिळते. कंपनीनुसार रेग्युलर 220-व्होल्ट सॉकेटने पूर्ण चार्ज होण्यासाठी या कारला 13.5 तास लागतात. तसेच 6.6 किलोवॅट एसी चार्जरद्वारे ते केवळ 4.5 तासांमध्ये ही कार चार्ज केले जाऊ शकते. नॅनो EV ला रिव्हर्सिंग कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, AC, कीलेस एंट्री सिस्टीम, LED हेडलाइट्स आणि 7 इंचाची डिजिटल स्क्रीन मिळते.

हेही वाचा: अगदी कमी किमतीत खरेदी करा 7 सीटर कार, 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन

टाटा नॅनोपेक्षाही असेल लहान

कंपनीने ही कार 2021 टियांजिन इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये सादर केली. अर्बन यूजसाठी बनवलेल्या या कारमध्ये फक्त दोन सीट देण्यात आल्या आहेत. कारची टर्निंग रेडीस 4 मीटरपेक्षा कमी आहे. तर डायमेंशन्स मध्ये नॅनो ईव्हीची लांबी 2,497 मिमी, रुंदी 1,526 मिमी आणि उंची 1,616 मिमी आहे. म्हणजेच ही कार आकाराने टाटा नॅनोपेक्षा लहान असेल. टाटा नॅनोची लांबी 3 मीटरपेक्षा जास्त आहे. या कारमध्यये 1,600mm चा व्हीलबेस मिळेल.

loading image
go to top