Airtel की Jio? डेटा प्लानच्या शर्यतीत कोण ठरेल बेस्ट; वाचा तुम्हाला परवडणारी ऑफर कोणती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airtel Vs Jio

Airtel की Jio? डेटा प्लानच्या शर्यतीत कोण ठरेल बेस्ट; वाचा तुम्हाला परवडणारी ऑफर कोणती

Airtel ने अलीकडेच 65 रुपयांचा रिचार्ज प्लान लाँच केलाय. हा कंपनीचा सगळ्यात स्वस्त डेटा प्लान आहे. यानंतर आता Jio कंपनीनेदेखील त्यांच्या यूजर्ससाठी किमती किमतीतील एक प्लान ऑफर लाँच केलाय. दोन्ही कंपन्यांच्या प्लानबाबत जाणून घेतल्यानंतर तुम्हाला परवडणारा प्लान कुठला ठरतो हेही तुम्हाला कळेल.

एअरटेलचा 65 रुपयांचा प्रीपेड प्लान हा एक डेटा वाउचर आहे. यात कंपनी यूजर्सना 4G डेटा देतेय. या ऑफरमध्ये एअरटेल कस्टमरला कुठलेही कॉलिंग किंवा एसएमएस बेनिफिट मिळणार नाहीये.

या प्लानची वॅलिडीटी प्रायमरी प्लाननुसार असणार आहे. म्हणजेच तुमच्या प्रायमरी प्लानची वॅलिडीटी 28 दिवसांची असेल तर या प्लानची वॅलिडीटीसुद्धा 28 दिवसांचीच असणार आहे. 4GB डाटा संपल्यानंतर यूजर्सना 50 पैसे प्रति MB चार्ज द्यावा लागेल.

हेही वाचा: Recharge Plan: BSNLचा जबरदस्त प्लॅन, 499 रुपयांत मिळतोय 3300 GB डेटा अन् बरंच काही

एअरटेलनंतर आता आपण जिओ प्लानकडे वळूया. ही कंपनी तुम्हाला 61 रुपयांत 6GB डेटा देतेय. या प्लाननुसार यूजर्सला कुठल्याही कॉल किंवा SMS ची सुविधा उपलब्ध नसणार आहे. तसेच एअरटेलप्रमाणे या प्लानमध्ये तुम्हाला प्रायमरी रिचार्जसारखी वॅलिडीटी नसणार आहे. अर्थात ऑनगोइंग प्लानच्या वॅलिडीटीप्रमाणे जियोच्या या प्लानची वॅलिडीटी असणार आहे. या ऑफरमध्ये यूजर्सला 4 रुपये कमी किमतीत एक्स्ट्रा 2GB डेटा दिल्या जातो.

हेही वाचा: Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

या ऑफरमध्ये हाय स्पीड 6GB डेटा संपल्यानंतर तुम्ही इंटरनेटचा वापर सुरु ठेऊ शकता. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर तुमची स्पीड मात्र 64Kbps असेल. हा केवळ डेटा प्लान असणार आहे हे यूजर्सने लक्षात ठेवावे. यासाठी तुम्हाला एखादा प्रायमरी प्लान वापरावा लागेल. त्यानंतरच तुम्ही प्रायमरी प्लान वापरू शकता.