Recharge Plan: BSNLचा जबरदस्त प्लॅन, 499 रुपयांत मिळतोय 3300 GB डेटा अन् बरंच काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bsnl introduces new broadband plan check all details here

Recharge Plan: BSNLचा जबरदस्त प्लॅन, 499 रुपयांत मिळतोय 3300 GB डेटा अन् बरंच काही

भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच आपलं बीएसएनएल आता जिओ आणि टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांशी फाईट द्यायला तयार झालंय असं दिसतंय. मागच्याच महिन्यात बीएसएनएल 4G लाँच करणार आहे अशा बातम्या आल्या होत्या. लगेच महिन्यात बीएसएनएलने ब्रॉडबँड युजर्ससाठी एक नवा प्लॅन आणलाय.

हा प्लॅन आहे फक्त 499 रुपयांचा. पण यात बीएसएनएल युजर्सना 3300GB हाय-स्पीड डेटा मिळणार असून हा हाय-स्पीड डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 4Mbps पर्यंत कमी होईल.

बीएसएनएलच्या या 499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 40Mbps पर्यंत स्पीड देण्यात आलं आहे. तुम्ही हाय स्पीडवर 3300 GB डेटा वापरू शकता. पण तुमचा डेटा संपला तर 4Mbps च्या स्पीडने तुम्ही अनलिमिटेड डेटा वापरू शकता.

हेही वाचा: Blue Tick : मस्कच्या कृपेने देवालाही मिळणार ब्लू टिक? Twitter वर वेरिफाइड झाले जीसस क्राइस्ट

काय आहे बीएसएनएलचा 499 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

आता या डेटा व्यतिरिक्त तुम्हाला या 499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये कॉलिंग बेनिफिट्स पण मिळणार आहेत. म्हणजेच यूजर्सला अनलिमिटेड डेटासोबतच अनलिमिटेड कॉलिंगचे देखील फायदे मिळणार असल्याचं टेलिकॉम टॉक आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटलंय.

पहिल्या महिन्याच्या बिलावर ग्राहकांना 500 रुपयांची सूटही मिळणार असल्याचं या रिपोर्ट मध्ये म्हटलंय. प्लॅनपेक्षा 50 रुपयांनी कमी असणारा कंपनीचा आणखी एक ब्रॉडबँड प्लॅन आहे.

यात बायर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जाते. पण असं म्हटलं जातंय की कंपनी त्यांचे 775 आणि 275 रुपयांचे ब्रॉडबँड प्लॅन बंद करणार आहे. हे प्लॅन 15 नोव्हेंबरपर्यंत बंद करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Amazon Pay : 'Amazon Pay' वर तुमचेही पैसे अडकलेत? 'या' टिप्सने करता येतील बँकेत ट्रान्सफर

टॅग्स :BSNL