
या आहेत बजेटमध्ये येणाऱ्या बेस्ट फॅमिली कार, किंमत ५ लाखांहून कमी
affordable family cars : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, परंतु तुमचे बजेट फक्त 5 लाखांपर्यंत आहे, तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. भारतात फक्त 5 लाखांच्या आत अनेक उत्तम कार उपलब्ध आहेत, ज्या मायलेजसोबतच तुमच्या बजेटमध्येही बसतील. आज आपण अशाच काही तुमच्या खिशाला परवडणाऱ्या फॅमिली कार्सबद्दल जाणून घेणार आहोत. (Best Affordable Family Cars With High Mileage)
टाटा टियागो
या यादीतील पहिली खार टाटाची आहे. भारतात टाटा मोटर्स च्या गाड्यांना खूप प्रेम मिळतं, कारण स्वदेशी ऑटोमेकर आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेतात आणि त्यानुसार आपल्या कार बाजारात सादर करतात. टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी ही त्याची ताजी उदाहरणे आहेत, टाटा मोटर्सच्या Tata Tiago च्या पेट्रोल व्हेरिएंटबद्दल आपण जाणून घेणार आहोत. विशेष बाब म्हणजे या वाहनाला ग्लोबल NCAP कडून 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, कारमध्ये मागील डिफॉगरसह 15-इंच अलॉय व्हील, 7-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा टियागो हॅचबॅक कारला 1.2-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन मिळते, जे 84bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. त्याची किंमत 4.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
हेही वाचा: वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी
मारुती सुझुकी अल्टो
मारुती सुझुकी अल्टो ही तिच्या अत्यंत किफायतशीर किंमतीमुळे नेहमीच सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये येणारी ही कार मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आजही वरदान ठरत आहे. मायलेजच्या बाबतीत, अल्टो सीएनजीवर 32 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
इंजिन- त्याचे इंजिन 796cc 3-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे 47.3 Hp ची शक्ती आणि 69 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. या कारची किंमत 2,99,800 रुपये आहे.
हेही वाचा: आता प्रत्येकसाठी एकच Digital ID; पॅन, आधार, पासपोर्टसह DL होणार लिंक
रेनॉल्ट क्विड
ही कार अतिशय वाजवी दरात मिळते. रेनॉल्टची ही हॅचबॅक कार रस्त्यावरून किंवा ट्रॅफिकमधून चालवण्यासाठी खूप सोपी आहे. कारमध्ये तुम्हाला 1.0-लिटर 3-सिलेंडर, पेट्रोल इंजिन दिले आहे जे 68 एचपीची कमाल शक्ती आणि 91 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत 3.32 लाख रुपये आहे आणि ती 21 ते 22 किमी प्रति लिटरचे मायलेज देते.
हेही वाचा: QR कोड स्कॅन करुन पेमेंट करताय? मग ही खबरदारी जरुर घ्या, अन्यथा..
Web Title: Affordable Family Cars With High Mileage Priced Below 5 Lakh Rupees See List
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..