QR कोड स्कॅन करुन पेमेंट करताय? मग ही खबरदारी जरुर घ्या, अन्यथा..

QR (क्विक रिस्पॉन्स) कोडसारखे स्कॅन आणि पेमेंट ऑप्शन आपण बऱ्याच दिवसांपासून वापरत आहोत.
QR Code Scan Safety Tips
QR Code Scan Safety Tips

QR Code Scan Safety Tips : QR (क्विक रिस्पॉन्स) कोडसारखे स्कॅन आणि पेमेंट ऑप्शन आपण बऱ्याच दिवसांपासून वापरत आहोत. पण कोरोना महामारीनंतर त्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यांना माहित नाही अशांसाठी, QR कोड हा चौकोनी बारकोड असतो, जो आपण ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करण्यासाठी स्मार्टफोनच्या कॅमेराने स्कॅन करतो. QR कोड अनेक कामांसाठी उपयोगी ठरतो, हा वापरुव तुम्हाला वेबसाइट क्विक एक्सेस करता येते, अॅप डाउनलोड करणे, रेस्टॉरंट मेनू पाहणे आणि बरेच काही याच्या मदतीने करता येते.

तिकिटे, फोन नंबर, ईमेल एड्रेस आणि पैसे ट्रांसफरसह माहिती आणि डेटा शेअर करण्यासाठी देखील क्यूआर कोड(QR Code) चा वापर वाढल्याने, सायबर फसवणूक (Cyber Fraud) करणारे आता लोकांची फसवणूक करण्यासाठी त्यांचा वापर करत आहेत. अलीकडेच, लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार QR कोडचा वापर कसा करतात याबद्दल लोकांना चेतावणी समोर आली आहे.

QR Code Scan Safety Tips
वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी

QR कोड स्कॅन करताना काय करावे आणि करू नये

तुम्ही कोणताही QR कोड स्कॅन करता तेव्हा तुम्ही ती URL तपासली पाहिजे ज्यावर ते तुम्हाला रीडायरेक्ट करत आहे त्या वेबसाईटचा URL व्यवस्थित पाहून घ्या. बनावट URL ओळखण्यासाठी त्यामध्ये टायपो किंवा चुकीचे शब्द आहेत का हे तपासून पाहा. फसवणूक करणाऱ्या URL मध्ये शब्द चुकीचे वापरलेले असतात. तुम्ही एक्सटर्नल टूल वापरून लहान केलेल्या QR कोडची URL स्कॅन करणे देखील टाळावे. लहान केलेली URL वापरकर्त्यांना वेबसाइटचे नाव दाखवत नाही.

तुम्ही QR कोडद्वारे अॅप्स डाउनलोड करत असाव तर असे करणे टाळावे, कारण त्यामुळे बनावट अॅप्स डाउनलोड होऊ नशकतात आणि त्यामधून तुमच्या स्मार्टफोनमधून वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. Google Play Store किंवा Apple App Store मधूनच तुमच्या फोनवर अॅप डाऊनलोड करणे सुरक्षित आहे.

QR Code Scan Safety Tips
रेडमी फोन स्वस्तात खरेदीची संधी, मिळतोय बंपर डिस्काउंट; एकदा पाहाच

प्रत्यक्ष QR कोड स्कॅन करण्यापूर्वी, कोडमध्ये छेडछाड झालेली नाही याची खात्री करून घ्यावी, उदा. मूळ कोडवर स्टिकर लावले असेल आणि त्याबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही संबंधित व्यक्तीकडून ते पुन्हा तपासून घ्या किंवा असे कोड वापरणे टाळा.

कोणतीही वेबसाइटवर उघडणाऱ्या QR कोडद्वारे कोणत्याही गोष्टीसाठी पैसे देऊ नका. तुम्हाला QR कोडद्वारे पेमेंट करायचे असल्यास, ते वैध पेमेंट अॅपद्वारे केले जाणे आवश्यक आहे, जेथे तुम्ही प्राप्तकर्त्याच्या ओळख कंफर्म करू शकता. तुम्हाला कोणत्याही वेबसाइटद्वारे पेमेंट करायचे असल्यास तुम्ही स्वतः URL टाइप करा.

नेहमी हे लक्षात ठेवा की QR कोड हा एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी स्कॅन केला जातो, पैसे मिळवण्यासाठी नाही. पैसे किंवा पेमेंट करण्याचा दावा करणारा ईमेल किंवा मॅसेजद्वारे पाठवलेला कोणताही QR कोड तुम्ही कधीही स्कॅन करू नये.

QR Code Scan Safety Tips
रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com