कमालीची ऑफर! २१ रुपयात एक महिना चालणार सिम, वाचा प्लॅन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSNL Affordable Plan

कमालीची ऑफर! २१ रुपयात एक महिना चालणार सिम, वाचा प्लॅन

रिचार्ज कसा स्वस्त्यात स्वस्त मिळवता येईल यासाठी ग्राहकांची धडपड चालली असते. तर ग्राहकांना एकापेक्षा एक भारी ऑफर कसे देता येईल याची कंपन्यांमध्ये शर्यत चालली असते. बीएसएनएल कंपनी जरी तुम्हाला जिओ, एअरटेल आणि Vi सारखी फास्ट इंटरनेट स्पीड देत नसली तरी ग्राहकांसाठी एक खास आणि स्वस्त ऑफर देत आहे. केवळ २१ रुपयांत ३० दिवसांच्या वॅलिडिटीसह ही नवी ऑफर असणार आहे. (BSNL Affordable Plan)

ही कंपनी अफोर्डेबल प्लॅन ऑफर करत असते. BSNLच्या पोर्टफोलियोमध्ये असे काही प्लॅन्स आहेत जे दुसरे टेलिकॉम ऑपरेटर ऑफर करू शकत नाहीत. त्यातच कंपनी असे काही प्लॅन ऑफर करते ज्यात तुम्ही स्वस्त दरात तुमचं सिम कार्ड महिनाभर अॅक्टिव्ह ठेऊ शकता. असाच एक रिचार्ज प्लॅन २१ रुपयांचा आहे. याला रेट कटर असेही म्हटल्या जातं. २०१६ वर्षात ही ऑफर सगळ्यात जास्त डिमांडिंग होती. आता लेटेस्ट ऑफर आणि काळाच्या ओघात अनेक कंपन्या असे ऑफर्स देत नसली तरी BSNL कंपनी आजही अशा ऑफर देतेय.

कंपनीने हा प्लॅन VOICE RATE CUTTER 21 या नावाने लिस्टेड आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला २० पैस्यांच्या प्रति दराने ऑन नेट आणि ऑफ नेट कॉल्स मिळतात. या रेट कटरची वॅलिडिटी ३० दिवसांची आहे.

या लोकांसाठी ही बेस्ट ऑफर

हा प्लॅन सगळ्यांसाठी नसून कंपनी हा प्लॅन स्पेसिफिक सर्कलमध्येच ऑफर करते. जर तुम्ही दोन सिम कार्ड वापरत असाल आणि BSNL तुमचं प्रायमरी सिम कार्ड असेल तर तुम्ही या प्लॅनचा लाभ घेऊ शकता.

एक वर्ष स्वस्तात अॅक्टिव्ह ठेवा सिम

या कंपनीव्यतिरिक्त कोणतीही कंपनी सध्यातरी ग्राहकांना अशी ऑफर देत नाहीये. या प्लॅनमध्ये अत्यंत कमी किमतीत तुम्ही एक वर्षापर्यंत तुमचं सिम अॅक्टिव्ह ठेवू शकता. यासाठी तुम्हाला बारा रिचार्ज करावे लागतील. २५२ रुपयांत एक वर्षापर्यंत तुम्ही तुमचं सिम अॅक्टिव्ह ठेवू शकता.